अटी व शर्ती / Terms & Conditions

Last Updated: July 11, 2026

अटी व शर्ती

महत्त्वाची सूचना

कृपया कोणत्याही सदस्यासोबत कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू नयेत. आपण स्वतःच्या जबाबदारीवर कोणताही आर्थिक व्यवहार केल्यास त्यासंबंधित सर्व जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील. अशा व्यवहारांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही आर्थिक, कायदेशीर किंवा वैयक्तिक वादासाठी लग्न विशेष विवाह संस्था जबाबदार राहणार नाही.

तसेच सदस्यांमधील वैयक्तिक चर्चा, भेटीगाठी, निर्णय, व्यवहार किंवा इतर कोणत्याही खासगी बाबींसाठी संस्था उत्तरदायी राहणार नाही.

१. नोंदणी शुल्क

संस्थेचे सभासदत्व मिळविण्यासाठी वार्षिक नोंदणी शुल्क भरावे लागेल.

सेवा शुल्क वैधता
वार्षिक नोंदणी / नूतनीकरण ₹३९९/- १ महिना
वार्षिक नोंदणी / नूतनीकरण ₹१४९९/- १ वर्ष
वार्षिक नोंदणी / नूतनीकरण ₹३४९९/- ३ वर्ष
वार्षिक नोंदणी / नूतनीकरण ₹४९९९/- ५ वर्ष

नोंदणी शुल्काचा भरणा केवळ संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळ किंवा मोबाईल अॅपवरील ऑनलाइन पेमेंट प्रणालीद्वारे (UPI, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड इ.) करावा.

२. परतावा (Refund Policy)

नोंदणी शुल्काचा भरणा केल्यानंतर ४८ तासांच्या आत, संस्थेची सेवा समाधानकारक वाटली नाही, तर सदस्य परताव्यासाठी (Refund) विनंती करू शकतात. परताव्याची विनंती संस्थेच्या अटी व पडताळणी प्रक्रियेनुसार विचारात घेतली जाईल.

४८ तासांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, भरलेले नोंदणी शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नाही.

संपूर्ण तपशीलासाठी परतावा धोरण पहा.

३. नोंदणी प्रक्रिया

सर्व नवीन नोंदणी, माहिती अद्ययावत करणे व नूतनीकरण ही प्रक्रिया केवळ संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरतीच करावी.

४. स्थळ शोध सुविधा

संकेतस्थळ किंवा मोबाईल अॅपवर उपलब्ध शोध सुविधेद्वारे वय, उंची, शिक्षण, व्यवसाय, नोकरी, मंगळ, जिल्हा, तालुका, मूळ गाव, धर्म, जात तसेच इतर निकषांनुसार स्थळांचा शोध घेता येईल.

५. अतिरिक्त शुल्काबाबत

लग्न विशेष विवाह संस्था विवाह निश्चित झाल्यानंतर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारत नाही. संस्थेच्या नावाने कोणीही अतिरिक्त पैसे मागितल्यास त्वरित संस्थेशी संपर्क साधावा.

६. प्रोफाइल अद्ययावत सुविधा

सदस्यांना त्यांच्या प्रोफाइलमधील माहिती, छायाचित्रे व इतर तपशील आवश्यकतेनुसार अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी आपली प्रोफाईल मध्ये लॉगिन करून माहिती अद्यावत करू शकता.

७. विवाह निश्चित झाल्यानंतर

आपला विवाह संस्थेमार्फत किंवा इतर कोणत्याही माध्यमातून निश्चित झाल्यास कृपया त्याची माहिती संस्थेला त्वरित द्यावी.

८. माहितीची पडताळणी

संस्थेकडून उपलब्ध करून दिलेल्या प्रत्येक प्रोफाइलची स्वतंत्र पडताळणी करणे ही संबंधित सदस्य व त्यांच्या पालकांची जबाबदारी आहे. लग्नाचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी स्थळाची पूर्ण चौकशी ऑनलाईन / ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करावी. पूर्ण खात्री पटल्यानंतरच अंतिम निर्णय घ्यावा. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नये.

९. विवाहाची हमी

लग्न विशेष विवाह संस्था केवळ विवाह परिचयाचे व्यासपीठ उपलब्ध करून देते. कोणत्याही सदस्याचा विवाह निश्चित कालावधीत होईल किंवा निश्चितच होईलच अशी कोणतीही हमी लग्न विशेष विवाह संस्था देत नाही.

१०. निर्णयाची जबाबदारी

स्थळ निवडताना संबंधित व्यक्तीची शैक्षणिक पात्रता, व्यवसाय, आर्थिक स्थिती, आरोग्य, कौटुंबिक पार्श्वभूमी, अपेक्षा व इतर आवश्यक बाबींचा योग्य विचार करूनच अंतिम निर्णय घ्यावा.

११. माहितीचा गैरवापर

संस्थेकडून मिळालेल्या कोणत्याही माहितीचा, संपर्क क्रमांकाचा, छायाचित्रांचा किंवा वैयक्तिक तपशीलांचा गैरवापर करणे, व्यावसायिक वापर करणे किंवा तृतीय पक्षास देणे निषिद्ध आहे. असे आढळल्यास संबंधित सदस्याचे सभासदत्व कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द केले जाऊ शकते तसेच आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

१२. वयोमर्यादा

भारतीय कायद्यानुसार विवाहासाठी पात्र असलेलेच सदस्य नोंदणी करू शकतात.

  • महिला: किमान १८ वर्षे पूर्ण
  • पुरुष: किमान २१ वर्षे पूर्ण

१३. घटस्फोटित सदस्य

घटस्फोटाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असलेले किंवा अंतिम निकालाची प्रतीक्षा करणारे सदस्य त्यांच्या सद्य वैवाहिक स्थितीची अचूक माहिती देऊन नोंदणी करू शकतात. चुकीची माहिती दिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित सदस्याची राहील.

१४. परदेशातील सदस्य

भारतीय किंवा परदेशात राहणारे सदस्य त्यांच्या देशातील तसेच भारतीय कायद्यांनुसार विवाह करण्यास कायदेशीर पात्र असल्यास संस्थेमध्ये नोंदणी करू शकतात.

१५. प्रचारासाठी माहितीचा वापर

संस्थेच्या सेवा, जाहिरात व प्रचारासाठी सदस्यांच्या प्रोफाइलमधील छायाचित्रे किंवा माहितीचा संपूर्ण किंवा अंशतः वापर केला जाऊ शकतो. आवश्यकतेनुसार वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल.

१६. प्रोफाइल हटविण्याचे नियम

प्रोफाइल सक्रिय झाल्यानंतर पहिल्या ३ महिन्यांच्या कालावधीत प्रोफाइल हटविण्याची विनंती स्वीकारली जाणार नाही. त्यानंतर सदस्य संस्थेशी संपर्क साधून प्रोफाइल हटविण्याची विनंती करू शकतात.

१८. विवाहानंतर प्रोफाइल बंद करणे

आपला विवाह निश्चित झाल्यानंतर किंवा विवाह संपन्न झाल्यानंतर संस्थेला त्वरित माहिती देणे आवश्यक आहे, जेणेकरून आपले प्रोफाइल संकेतस्थळावरून हटवता येईल.

१९. चुकीची माहिती

सदस्यांनी नोंदणी करताना दिलेली सर्व माहिती खरी, अचूक व अद्ययावत असणे आवश्यक आहे. चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती आढळल्यास संस्था कोणतीही पूर्वसूचना न देता संबंधित प्रोफाइल रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवते.

२०. संस्थेचे अधिकार

सेवेची गुणवत्ता, सुरक्षितता किंवा कायदेशीर कारणास्तव संस्था कोणत्याही वेळी या अटी व शर्तींमध्ये आवश्यक ते बदल करण्याचा अधिकार राखून ठेवते. सुधारित अटी संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यानंतर त्या सर्व सदस्यांना लागू होतील.


Terms & Conditions

Important Notice

Please do not enter into any financial transactions with any member. If you undertake any financial transaction at your own responsibility, the concerned individual shall remain solely liable for it. Lagna Vishesh Matrimonial Services shall not be responsible for any financial, legal, or personal dispute arising from such transactions.

The organization shall also not be responsible for personal discussions, meetings, decisions, transactions, or any other private matters between members.

1. Registration Fee

Annual registration fee must be paid to obtain membership of the organization.

Service Fee Validity
Annual Registration / Renewal ₹399/- 1 Month
Annual Registration / Renewal ₹1,499/- 1 Year
Annual Registration / Renewal ₹3,499/- 3 Years
Annual Registration / Renewal ₹4,999/- 5 Years

Registration fees must be paid only through the official website or mobile app online payment system (UPI, Net Banking, Debit Card, Credit Card, etc.).

2. Refund Policy

Within 48 hours of paying the registration fee, if a member is not satisfied with the organization's service, they may request a refund. Refund requests will be considered as per the organization's terms and verification process.

After the 48-hour period, the registration fee paid shall not be refunded under any circumstances.

For full details, see our Refund Policy.

3. Registration Process

All new registrations, profile updates, and renewals must be done only through the organization's official website.

4. Profile Search Facility

Profiles can be searched on the website or mobile app based on age, height, education, occupation, job, Mangal status, district, taluka, native village, religion, caste, and other criteria.

5. Additional Charges

Lagna Vishesh Matrimonial Services does not charge any additional fee after marriage is finalized. If anyone demands extra money in the name of the organization, please contact the organization immediately.

6. Profile Update Facility

Members may update profile information, photographs, and other details as required by logging into their profile.

7. After Marriage Finalization

If your marriage is finalized through the organization or through any other medium, please inform the organization immediately.

8. Verification of Information

Independent verification of each profile provided by the organization is the responsibility of the concerned member and their parents/guardians. Complete inquiry of the profile should be done online and offline before taking a final decision. A final decision should be taken only after full satisfaction. No decision should be taken in haste.

9. No Guarantee of Marriage

Lagna Vishesh Matrimonial Services only provides a matrimonial introduction platform. The organization does not guarantee that any member's marriage will be finalized within a specific period or that marriage will definitely take place.

10. Responsibility of Decision

While selecting a match, the final decision should be taken only after proper consideration of the person's educational qualification, occupation, financial status, health, family background, expectations, and other necessary factors.

11. Misuse of Information

Misuse, commercial use, or sharing with third parties of any information, contact numbers, photographs, or personal details obtained from the organization is prohibited. If such misuse is found, the membership of the concerned member may be cancelled without prior notice and legal action may be taken if necessary.

12. Age Limit

Only members eligible for marriage under Indian law may register.

  • Women: Minimum 18 years completed
  • Men: Minimum 21 years completed

13. Divorced Members

Members whose divorce proceedings are ongoing or who are awaiting final judgment may register by providing accurate information about their current marital status. If false information is provided, the concerned member shall be fully responsible.

14. Overseas Members

Indian or overseas-residing members may register with the organization if they are legally eligible to marry under the laws of their country as well as Indian laws.

15. Use of Information for Promotion

Photographs or information from member profiles may be used wholly or partly for the organization's services, advertisements, and promotions. Personal information will be kept confidential as far as possible.

16. Profile Deletion Rules

Requests to delete a profile will not be accepted during the first 3 months after the profile becomes active. Thereafter, members may contact the organization to request profile deletion.

18. Closing Profile After Marriage

After your marriage is finalized or completed, you must inform the organization immediately so that your profile can be removed from the website.

19. Incorrect Information

All information provided by members at the time of registration must be true, accurate, and up to date. If false or misleading information is found, the organization reserves the right to cancel the concerned profile without prior notice.

20. Rights of the Organization

For reasons of service quality, security, or legal requirements, the organization reserves the right to make necessary changes to these Terms & Conditions at any time. Revised terms shall apply to all members once published on the website.

These Terms & Conditions were last updated on July 11, 2026.

Have Questions?

Contact us if you need clarification about these terms.